ऑनलाईन टीम / पुणे :
गणपती बाप्पा मोरया… कोरोनाला हरवूया… अशा गजरात शनिपार मंडळाच्या श्रीं चे जलकुंडात विसर्जन झाले. मानाच्या पाच गणपतींच्या विसर्जनानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते शनिपार मंडळाच्या श्रीं चे मंगळवारी दुपारी 2 वाजता मंदिरासमोर विसर्जन झाले. शनिपार मंडळ ट्रस्टचे यंदा 128 वे वर्ष आहे.
यावेळी गोरख पळसकर, विकास घोले, प्रशांत मेटकर, राजू गदादे, समीर गायकवाड, हर्षद पाबळे, माऊली ढमढेरे, धनंजय जैनाक, आनंद काळभोर, ओंकार चव्हाण, अभिषेक पारवे, अर्जुन शिंदे, शुभम नागोरी यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
विसर्जन मिरवणुकीकरीता भव्य व नाविन्यपूर्ण रथ साकारण्याकरीता सुप्रसिद्ध असलेल्या शनिपार मंडळ ट्रस्टने यंदा मंदिरातच गणेशोत्सव साजरा करीत मंदिरासमोर साधेपणाने विसर्जन केले. पुणे मनपा आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करीत यंदाचा उत्सव साजरा करण्यात आला. महापौरांनी कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मंडळातर्फे त्यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला.








