थंडीचा मौसम सुरू झाला की उत्तर भारतात शक्करकंद घेऊन गाडय़ा लागतात. उत्तर भारतातून हि रेसीपी अर्थात पलीकडे गेली असणार.
साहित्यः
4 लाल रताळी
प्रकार 1 शक्करकंद मसाला : अर्धा चमचा चाट मसाला, बारीक चिरलेली कोरडी केलेली पुदीना पानं, पादेलोण किंवा काला नमक, 1 चमचा लाल मिर्च, चिमटीभर काळं मिरी हे सर्व एकत्र करून ठेवावं. सगळय़ात शेवटी वेगळय़ा कपात 2 चमचे लिंबू रस,2 चमचे ताजा गोड संत्रा रस एकत्र करून तयार ठेवावा. नाहीतर लिंबू व संत्र ताजे काप्पोन पिळावे.
दुसरा प्रकार : पुदीना चटणी: 4-5 ताजी पुदीना पाने, लिंबू रस एक चमचा, कोथिंबीर, 2 चमचे संत्रा रस, पाव चमचा लाल मिर्च, काळीमिरी चिमटभर, काला नमक एकत्र बारीक वाटून ठेवावं.
कुरकुरीत पीठी कवरः एक चमचा तांदूळाचं पीठ, चवीला मीठ, चिमटभर आरारूट पीठी.
क्रमवार पाककृती: प्रकार 1:
स्वच्छ धूवून रताळी शेगडीवर भाजावी. रताळी काळी झाली की सालीसकटच कुस्करावी ओबडधोबड. वरील शक्करकंद मसाला क्र.1 टाकून लिंबू व संत्रा रस पिळून मग गरमा गरम खावं. रताळय़ाची गोडसर चव, आंबट तिखट चव एकदम मस्त लागते. शेवटी द्रोणात उरलेला लिंबू रस व संत्रा रस प्यावा.
दुसरा प्रकार : जरा खटपटीचा आहे. पण तोहि छान लागतो. भाजलेल्या रताळय़ाच्या गोल फोडी करून कापल्यावर गरम असतानाचा वरची पीठी लगेच भुरभुरावी. आणि लोण्यात दोन तीन मिनिटंच तळून (शॅलो फ्राय) काढून मग प्लेटमध्ये मांडून वरून पुदीना चटणी लावावी. शेजारी गोड दह्यात जरासा चाट मसाला टाकून द्यावा. एक घास दह्याचा, एक घास गरमागरम शक्करकंद-पुदीना चटणी एकाfत्रत मस्त लागतं.
थंडी पळून जाईल. मस्त चटकदार सोपा पदार्थ नाश्ता म्हणून खाता येईल.
अधिक टिपा: शेगडीवर भाजलेली रताळी मस्त लागतात, नसेल तर गॅस आहेच. पण उकडू नका. चव येणार नाही. रताळी काळी झाली तर आतून नैसर्गिक साखर करपून चव छान लागते.









