प्रतिनिधी / बेळगाव
मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांची कर्नाटक सरकारचे खास प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांनी भेट घेतली. त्यांनी दीपावळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच केंद्रीय मंत्र्यांची झालेली भेट, विविध विकास व प्रकल्पांवर चर्चा याबाबतची माहिती देखील शंकरगौडा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.
कर्नाटक सरकारचे मुख्य प्रतिनिधी म्हणून शंकरगौडा पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर ते दिल्ली येथील अधिकाऱयांशी तसेच मंत्र्यांशी संपर्कात आहेत. दिल्ली येथेच ते थांबून राज्यातील विविध समस्यांबाबत माहिती देत असतात. समस्या सोडविण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. ही सर्व माहिती आता शंकरगौडा पाटील यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांना दिली आहे.