प्रतिनिधी/ बेळगाव
मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव व भाजपचे ज्ये÷ नेते शंकरगौडा पाटील यांची राज्य सरकारने दिल्ली प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना कॅबिनेट दर्जाही देण्यात आला आहे. रविवारी यासंबंधी आदेश जारी करण्यात आला आहे.
27 सप्टेंबर 2019 रोजी मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. या नियुक्तीचे आदेश मागे घेऊन रविवारी कर्नाटक सरकारचे नवी दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी म्हणून राज्य सरकारने त्यांची नियुक्ती केली आहे. शंकरगौडा पाटील हे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे खंदे समर्थक आहेत.









