मुंबई
कर्जात बुडालेली टेलिकॉम क्षेत्रातील कंपनी व्होडाफोन आयडिया आपली थकबाकीची रक्कम येत्या सप्टेंबरपर्यंत भरणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सरकारकडे सुमारे 2400 कोटी रुपये व्होडाफोन आयडिया कंपनी भरणार असल्याचे समजते. परवाना शुल्क व इतर चार्जसंबंधीत मार्च तिमाहीसाठीचे 450 कोटी रुपये अलीकडेच सरकारकडे भरले आहेत. कंपनी आता जून 2023 तिमाहीपर्यंतची थकीत रक्कमही भरण्याच्या तयारीत आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत सदरची रक्कम व्याजासह भरण्याचे नियोजन कंपनी करत आहे. जुलैपर्यंत कंपनीला परवाना शुल्करुपी 770 कोटी रुपये सरकारकडे भरायचे आहेत. याचबरोबर 1680 कोटी रुपयेही भरायचे आहेत.









