3 जी ग्राहकांना मिळणार 4 जी सुविधा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडिया लिमिटेड(व्हीआयएल)च्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. कंपनीने आपल्या 3 जी ग्राहकांना 4 जी अपग्रेड करता येणार असल्याची घोषणा केली आहे. यामध्ये 3 जी ग्राहकांसाठी कोणीही 4 जी सारख्या हाय इंटरनेट स्पीडचा डाटा आणि अन्य सेवा वापरु शकणार असल्याची माहिती कंपनीने नुकतीच दिली आहे. कंपनीने 2 जी ग्राहकांसाठी जास्तीत जास्त ग्रामीण भागामध्ये त्यांना या अगोदरपासून क्हॉईस सर्व्हिस मिळत असल्याचे म्हटले आहे.
नुकत्याच सादर केलेल्या माहितीनुसार व्होडाफोन आयडिया आता आपल्या 3 जी ग्राहकांना व्ही गीगा नेटवर्कवर पहिल्यापेक्षाही वेगवान 4 जी डाटा देणार आहे. यामध्ये 4 जी आणि 4 जी बेसड आयओटी ऍप्लिकेशन आणि सेवा अपग्रेड करता येणार आहे. 4 जी कव्हरेजच्याअंतर्गत देशातील जवळपास 1 अब्ज ग्राहकांपर्यंत हायस्पीड डाटा सेवा दिली जाईल.









