खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी सुविधेचा होणार वापर
नवी दिल्ली
आता फक्त मेसेजिंग ऍप म्हणून व्हॉटसऍपचा वापर होणार नसून येत्या काळात त्याचा खरेदी विक्रीसाठीही वापर वाढण्याचे संकेत आहेत. यासाठी व्हॉटसऍपने नवीन शॉपिंग बटन सादर केले आहे, अशी माहिती फेसबुककडून देण्यात आली आहे.
भारतासह जगभरातील व्हॉटसऍप शॉपिंग बटनला रोलआउट करण्यात आले आहे. यांच्या मदतीने ग्राहकांना आपल्या पसंतीचे उत्पादन बाजारातून खरेदी विक्री करता येणार आहे. यामध्ये चॅटिंग करताना थेट खरेदी विक्रीचा मार्ग उपलब्ध होणार आहे.
नवीन फिचरसोबत बिझनेस नावाने डाव्या बाजूला स्टोअर प्रंटचा आयकॉन देण्यात आला आहे. याच्या आधारे ग्राहक कॅटलॉगमधून सेवांची माहिती ग्राहकांना होणार आहे. जगासोबत देशातील व्हॉटसऍपच्या ग्राहकांना थेट व्यवसायासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार आहे. व्हॉटसऍपच्या बिजनेस या खात्यावर दररोज 17.5 कोटीपेक्षा अधिक जण मेसेज करत असतात.









