वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
कार निर्मिती करणारी जर्मन कंपनी व्हॉक्सवॅगनकडून पाच सिटरची एसयूव्ही टी-रॉक कार भारतीय बाजारात दाखल केली आहे. यांची एक्स शोरुम किंमत 19.99 लाख रुपये असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. कंपनीकडून या अगोदर या मॉडेलचे दिल्ली मधील ऑटो एक्स्पो 2020 मध्ये सादरीकरण केले होते.
कंपनी सीबीयूच्या पातळीवर भारतात ही कार आयात करणार आहे. यात पाच डब्बल कलर मध्ये उपलब्ध होणार आहे. यांची विक्री एप्रिल महिन्यात सुरु करणार असल्याची माहिती असून या अगोदर ग्राहकांना 25000 रुपयात बुकिंग करण्याची सुविधा मिळणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
इंजिन क्षमता
व्हॉक्सवॅगन कंपनीचे टी-रॉक या मॉडेलचे इंजिन 1.5 लिटरचे टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनची सुविधा मिळणार आहे. या इंजिनची क्षमता ही 150 हॉर्स पॉवर इतकी आहे. यामुळे सदर कार 0 ते 100 किलोमीटर प्रतितास वेगाने 8.4 सेकंदात धावण्याची क्षमता असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
यासोबतच 6 एअर बॅग, टायर प्रेशर मॉनिटरिंग योजना व पार्किग फिचर आणि 8 इंचाची इंफोटेनमेंटची योजना असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.









