ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
व्हिसा फ्रॉडप्रकरणी अमेरिकेत राहणाऱ्या चार चिनी नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चिनी नागरिकांनी आपली खरी ओळख लपवून ठेवली. तसेच हे चीनच्या लष्करासाठी हे चोघे काम करत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे.
याप्रकरणी तीन नागरिकांना एफबीआयने अटक केली आहे. तर एक जण फरार आहे.
अमेरिका आणि चीनमधील संघर्ष ताणला गेल्याने अमेरिकेने त्यांच्या देशात राहणाऱ्या सर्वच चीनी नागरिकांची एफबीआयने तपासणी सुरू केली आहे. तसेच संशयितांना एफबीआय मुख्यालयात मुलाखतीसाठी बोलावून घेण्यात येत आहे. चिनी लष्कराचे लोक खोटी ओळख दाखवून अमेरिकेत राहत असल्याचे समोर आल्यानंतर अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे.
व्हिसा फ्रॉडप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांनी व्हिसासाठी खोटी माहिती देऊन फ्रॉड केला आहे. या आरोपींना दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.









