बेंगळूर : शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने व्हिक्टोरिया हॉस्पिटलचे पुन्हा कोविड रुग्णालयात रुपांतर झाले आहे. गेल्यावर्षी व्हिक्टोरिया हॉस्पिटलचे सर्वात मोठय़ा कोविड रुग्णालयात रुपांतर करण्यात आले होते. बेंगळूर वैद्यकीय कॉलेज आणि संशोधन संस्थनेने गेल्यावर्षी 1500 बेड कोरोनाबाधितांसाठी राखीव ठेवले होते. दरम्यान, बाधितांची संख्या कमी झाल्यानंतर याठिकाणी सार्वजनिकांना उपचार देण्यास प्रारंभ करण्यात आला होता. पण आता परत शहरात बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने व्हिक्टोरियाचे कोविड रुग्णालयात रुपांतर करण्यात आले आहे. व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये बेंगळूरसह राज्यातील विविध भागातून रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. पण आता शहरातील बाधितांची संख्या कमी होईपर्यंत केवळ कोरोनाबाधित रुग्णावरच याठिकाणी उपचार केले जाणार आहे. हॉस्पिटलच्या आवारातील ट्रामा केअर सेंटर 2020 मार्चपासून कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी राखीव ठेवले आहेत. शहरात बाधितांची संख्या वाढत असल्याने हॉस्पिटलचे रुपांतर कोविड रुग्णालयात करण्यात आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









