हनोई
व्हिएतनाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे स्थिती बिकट झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर तेथील सरकार आता पूरग्रस्त भागांमधून सुमारे 13 लाख लोकांना अन्यत्र हलविण्याची तयारी करत आहे. मोलेव या चक्रीवादळामुळे तेथील स्थिती बिघडली आहे.
मोलावे चक्रीवादळामुळे 125 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वारे वाहत आहेत. 4 महिन्यांमध्ये व्हिएतनाममध्ये हे चौथे चक्रीवादळ धडकले आहे. व्हिएतनाम अनेक वर्षांमधील सर्वात भीषण पुराला तोंड देत आहे. पुरामुळे झालेल्या भूस्खलनात सैन्याच्या अनेक छावण्याही जमीनदोस्त झाल्या आहेत. भूस्खलनामुळे अनेक सैनिकही बेपत्ता झाले आहेत. 11 सैनिकांबद्दल कुठलीच माहिती मिळू शकलेली नाही.









