महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात दरवर्षी दिवाळी पहाट उत्साहात आयोजित केली जाते. या वर्षी ही पहाट व्हर्चुअली एन्जॉय करता यावी म्हणून व्हायरस मराठी दिवाळी पहाट, व्हायरस मराठी पहाच हा कार्यक्रम घेऊन येत आहे.
व्हायरस मराठीच्या प्रेक्षकांसाठी या वर्षीची दिवाळी मनोरंजनाची दिवाळी ठरणार आहे. कारण दिवाळीच्या निमित्ताने व्हायरस मराठीचे सर्व कलाकार पहिल्यांदाच एकत्र येत आहे. 10 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर दरम्यान षदिवाळी पहाट, व्हायरस मराठी पहाचष् या कार्यक्रमात प्रेक्षकांना कथा, कविता, चित्र, अभिवाचन एक ना अनेक गोष्टी या 7 दिवसात पाहायला मिळणार आहेत. या कार्यक्रमाची सुरवात श्तरतीतोश् पासून होणार असून 10, 11 आणि 12 नोव्हेंबरला सलग तीन दिवस या मालिकेचे दिवाळी विशेष भाग आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 13 नोव्हेंबरच्या दिवशी साहित्य चित्र मैफिलचे आयोजन केले असून यामध्ये अभिनेते- दिग्दर्शक समीर पाटील, लेखिका मनाली काळे, माझ्या नवऱयाची बायको फेम अभिनेत्री शर्मिला शिंदे आणि कल्पना जगताप, दिग्दर्शक संतोष कोल्हे यांचे कथा, कविता आणि अभिवाचनाचे सादरीकरण आणि सागर ढेकणेचे लाईव्ह पोर्टट्रेट अशा एकाहून एक सरस गोष्टी पाहायला मिळतील.14 नोव्हेंबरला अंकिता देसाई, रमेश चांदणे आणि सफजन देशपांडेची तर्मन मैफिल प्रेक्षकांचे मन रिजवेल यात शंकाच नाही. 15 आणि 16 नोव्हेंबरला चौतन्य सरदेशपांडे, अंकिता देसाई, सफजन देशपांडे, विनम्र भाबल आणि कुणाल बने यांची स्टँडअप कॉमेडी हास्याचा फराळ घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करायला तयार असणार आहे. हा उपक्रम आपल्याला व्हायरस मराठीच्या युटय़ुब चॅनेलवर पाहायला मिळणार असून 10 ते 16 नोव्हेंबरमध्ये रोज सकाळी 7 वाजता या कार्यक्रमाचे भाग प्रीमियर करण्यात येणार आहेत. मराठीत असा प्रयोग प्रथमच होत आहे.









