ऑल फीमेल कम्युनिकेशन टीम स्थापन : भारतीय वंशीय महिलेला जबाबदारी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेत नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये ऑल फीमेल सीनियर कम्युनिकेशन टीम तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. या टीमचे नेतृत्व केट बेडिंगफील्ड करणार आहेत. व्हाईट हाऊसच्या कम्युनिकेशन्स डायरेक्टर म्हणून त्यांना नियुक्ती मिळाली आहे. डेमोक्रेटिक पार्टीच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी स्वतःचा प्रसारमाध्यम सचिव म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय बायडेन यांनी घेतला आहे. तर भारतीय वंशाच्या नीरा टंडन यांनाही प्रशासनात महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे.
अमेरिकेत लोकांशी थेट आणि योग्य संवाद ठेवणे अध्यक्षांची जबाबदारी आहे. या टीमवर व्हाईट हाऊसला अमेरिकेच्या नागरिकांशी जोडून घेण्याची जबाबदारी आहे. ही टीम हा उद्देश पूर्ण करणार असल्याचा विश्वास आहे. टीममधील योग्य आणि अनुभवी संवादक वेगवेगळय़ा पैलूंवर काम करतील. सर्वजण अमेरिकेला पुन्हा सर्वोत्तम स्थान मिळवून देण्यासाठी झटणार असल्याचे उद्गार बायडेन यांनी काढले आहेत.
नीरा टंडन यांनी बायडेन यांच्या धोरणांच्या अंमलबजावणीवर देखरेख करण्याची जबाबदारी देण्यात येणरा आहे. सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेस नावाच्या थिंकटँकच्या त्या अध्यक्षा तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
व्हाईट हाऊसमध्ये नियुक्त होणाऱया तिन्ही वरिष्ठ महिला अधिकाऱयांनी ओबामा प्रशासनातही काम केले आहे. बायडेन उपाध्यक्ष असताना बेडिंगफील्ड त्यांच्या संवाद संचालिका आणि प्रवक्त्या होत्या. तर साकी व्हाईट हाऊसच्या विदेश विभागात संवाद संचालिका होत्या. टंडन यांनी तत्कालीन आरोग्य तसेच मानवाधिकार सचिव कॅथलीन सेबेलियस यांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून काम केलेले आहे.
आणखीन महिलांना मिळणार स्थान
बायडेन यांना पहिले अध्यक्षीय इंटेलिजेन्स ब्रीफिंग देण्यात आले आहे. व्यवस्थापन आणि अर्थसंकल्प कार्यालयासाठी बायडेन हे संचालक म्हणून महिला अधिकाऱयांची नियुक्ती करू शकतात. नियोजित उपाध्यक्षांच्या चीफ ऑफ स्टाफ राहिलेलया कॅरीन जीन आता पियरे बायडेन यांच्या मुख्य उपमाध्यम सचिव होणार आहेत. तर पाइली टोबर यांना व्हाईट हाऊसमध्ये डेप्युटी कम्युनिकेशन्स डायरेक्टर पद देण्यात येणार आहे. सेशिलिया राउस यांना कौन्सिल ऑफ इकॉनॉमिक ऍडव्हायजर्सची जबाबदारी दिली जाऊ शकते. वाली एडेयेमो यांना कोषागार विभागाचे उपप्रमुख दिले जाऊ शकते.









