मुंबई –
ग्राहकोपयोगी उपकरण बनवणाऱया व्हर्लफुल ऑफ इंडिया लिमिटेडला 31 मार्चला संपलेल्या चौथ्या तिमाहीत 40 टक्के इतका वाढीव नफा प्राप्त करता आला आहे. कंपनीने सदरच्या कालावधीत 130 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. मागच्या वर्षी समान कालावधीत कंपनीने 92 कोटी रुपयांचा नफा नोंद केला होता. मार्चला संपलेल्या तिमाहीत कंपनीने 1 हजार 779 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे, जो मागच्या वर्षाच्या तुलनेत 31 टक्के अधिक आहे. मागच्या वर्षी याच कालावधीत कंपनीने 1 हजार 353 कोटी रुपये महसूल मिळवला होता.









