ऑनलाईन टीम / मुंबई :
अर्थसंकल्पाविषयी सर्वांचीच उत्सुकता तानली गेली असताना व्यावसायिक गॅस दरात 224.98 रुपयांची वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलेंडरमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नाही.
मागील पाच महिन्यांपासून घरगुती गॅस (14.2 किलो) सिलेंडरमध्ये वाढ होत आहे. त्यानंतर पहिल्यांदाच फेब्रुवारीमध्ये अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरमध्ये वाढ झालेली नाही. मात्र, व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिकांचे बजेट आता वाढणार आहे.
सध्या 1325 रुपयांना मिळणारा व्यावसायिक गॅस सिलेंडर आता 1550 रुपयांना मिळणार आहे. आज सकाळपासून हे नवीन दर लागू करण्यात आले आहेत.









