प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात कोरोना पॉ†िझटिव्हीटी दर झपाटय़ाने वाढत आह़े सर्वसामान्य जनतेने काळजी न घेतल्यास नाईलाजास्तव लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल़ मात्र लॉकडाऊनमुळे व्यापाऱयांना मोठय़ा नुकसानीला सामोरे जावे लागत़े यासाठी जिह्यातील व्यापारी व विविध संघटनांशी चर्चा करूनच लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिल़ी
मंगळवारी जिह्यातील कोरोना परिस्थितीसंदर्भात जिल्हा प्रशासनासोबत मंत्री सामंत यांनी आढावा बैठक घेतल़ी यानंतर झूम ऍपद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सामंत यांनी जिह्यातील कोरोना स्थितीबाबत मा†िहती दिल़ी रत्नागिरी जिह्याचा पॉ†िझटिव्हीटी दर कमालीचा वाढला आह़े याचा ताण आरोग्य यंत्रणेवर येण्याची शक्यता आह़े याचा विचार करून प्रशासनाला योग्य त्या सूचना करण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितल़े
जिह्यात सध्या 1 हजार 36 ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत़ तसेच ऑक्सिजनचा पुरवठाही चांगला आह़े केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे आपल्याकडे तिसऱया लाटेचा मुकाबला करण्यासाठी अत्यावश्यक बेडची संख्या उपलब्ध आह़े भविष्यात ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, यासाठीही उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत़ लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्यासाठीही स्वतंत्र ऑक्सिजन बेड व व्हेंटीलेटरची सुविधा करण्यात आल्याची माहिती मंत्री सामंत यांनी दिली.
सोमवारपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले आह़े आतापर्यंत 1 हजार 774 मुलांनी लस घेतली आह़े 10 जानेवारीपासून प्रंटलाईन वर्कर व 60 वर्षावरील नागरिकांना बुस्टर डोस देण्यात येईल़ यासाठी जिह्यात 1 लाख 70 हजार डोस शिल्लक आहेत़ तर पुढील 15 दिवसात आणखी 15 हजार डोस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे सामंत यांनी सांगितले.
काळजी न घेतल्यास आठवडा बाजार बंद करणार
जिह्यातील आठवडा बाजारात नागरिक विनामास्क फिरत असल्याचे आढळले आह़े वाढत जाणारी कोरोना रूग्णांची संख्या यामुळे कोरोना प्रादुर्भाव वेगाने होण्याची शक्यता आह़े यासाठी नागरिकांनी यापुढे आठवडा बाजारात वावरताना काळजी न घेतल्यास नाईलाजास्तव आठवडा बाजार बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे सामंत म्हणाले.
विनामास्क दंडाची रक्कम 500 वरून 300 वर
विनामास्क फिरणाऱयांवर यापूर्वी 500 रूपये दंड आकारणी करण्यात येत होत़ी सर्वसामान्य नागरिकांसाठी 500 रूपये ही रक्कम अवाजवी ठरत आह़े यासाठी विनामास्क फिरताना आढळल्यास 500 रूपये ऐवजी दंडाची रक्कम 300 रूपये करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.









