वार्ताहर/ पुसेगाव
वर्धनगड येथील सूर्यकांत संपत सावंत या व्यापायांने स्वतः च दिलेल्या धनादेशात खाडाखोड केली असून गेल्या आठ दिवसांपासून पुसेगाव बाजारपेठ व व्यापारी यांना बदनाम करत आहे.याबाबत पुसेगाव ता खटाव येथील गणेश जालिंदर घाडगे व अन्य व्यापायांनी तक्रार केली आहे.
गणेश घाडगे यांनी दिलेल्या निवेदनानुसार वर्धनगड येथील सूर्यकांत सावंत या व्यापायांशी पुसेगावातील व्यापायांचा कांदा, बटाटा याचा खरेदी विक्री चा व्यवसाय झाला होता. काही दिवसांपूर्वी देण्याघेन्यावरून वादावादीही झाली होती.सावंत यांनी गणेश घाडगे या व्यापायांच्या घरी येऊन वारंवार पैशाची मागणी करत जीवे मारण्याची तसेच या व्यवसायातून संपवून टाकण्याची धमकीही दिली होती याबाबत गणेश घाडगे यांनी 17 जून 2021 रोजी सावंत यांच्या विरोधात पुसेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गणेश घाडगे यांच्या म्हणण्यानुसार व्यवहारातील झालेल्या रक्कमेचे धनादेश ही सावंत यांना दिले
होते.गणेश घाडगे यांनी 23 -3-2021 रोजी दिलेल्या धनादेशाची तारीख सावंत या व्यापायाने 23-8-2021 केली आहे,
व्यवहारातील रक्कमेच्या दिलेल्या धनादेशाच्या तारखेत स्वतःच खाडाखोड करत सूर्यकांत सावंत हे पुसेगाव बाजारपेठ व येथील व्यापायांची नाहक बदनामी करत आहेत ,होत असलेल्या नाहक त्रासामुळे आमचे कुटुंबीय तणावाखाली असल्याचे गणेश घाडगे यांनी निवेदनात म्हटले आहे