60 वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिक लसीकरणासाठी पात्र
कोल्हापूर / प्रतिनिधी
जगभरात वाढत असलेले कोविड रुग्ण व ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे जिह्यात 10 जानेवारीपासून 60 वर्षावरील व्याधीग्रस्त नागरिक, हेल्थकेअर व प्रंटलाईन वर्कर्स यांना कोविड लसीकरणाची दक्षता मात्रा (बुस्टर डोस) दिली जाणार आहे. जिह्यात 45 हजार 99 आरोग्य कर्मचारी, 92 हजार 445 प्रंटलाईन वर्कर्स व 2 लाखा 56 हजार 93 व्याधिग्रस्त नागरीक आहेत. या सर्वांनी लस घेऊन संकक्षित व्हावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी केले आहे.
जिह्यात 16 जानेवारीपासून कोविड लसीकारण मोहीम सुरु झाली असून जिल्हयाचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत जोमाने व शिस्तबद्ध पद्धतीने सुरु आहे. जिह्यात आजअखेर 18 वर्षावरील 93 टक्के लाभार्त्यांना पहिला डोस व 71 टक्के लाभार्त्यांना दुसऱया डोसचे लसीकरण करण्यात आले असून कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. 60 वर्षावरील व्याधीग्रस्त नागरीक व हेल्थकेअर आणि प्रंटलाईन वर्कर्स या लसीकरणासाठी पात्र आहे. या लाभार्थ्यांना दुसरा डोस घेऊन 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झाले असतील तर ते दक्षता मात्रा घेण्यास पात्र असतील. ज्या नागरिकानी किंवा हेल्थकेअर, प्रंटलाईन वर्कर्स यांनी पूर्वी नोंदणी करून पहिला व दुसरा डोस पूर्ण केला आहे, त्यांना दक्षता मात्रा घेण्यासाठी पुन्हा नव्याने नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. सदर लाभार्त्याना दुसरा डोस घेऊन 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झाले असतील तर ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑनसाईट सत्राचे ठिकाणी जाऊन लसीकरण करून घेता येईल. लसीकरणाच्या ठिकाणी जाताना आपले पूर्वी दिलेले ओळखपत्र किंवा पहिल्या व दुसऱ्या डोस नंतर मिळलेला संदर्भ क्रमांक व अधिकृत मोबाईल घेऊन जाणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफ लाईन पद्धतीने आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर दक्षता मात्रा घेता येईल. पहिल्या व दुसऱ्या डोससाठी ज्या प्रकारची लस घेतली आहे, त्याच लसीची दक्षता मात्रा दिली जाणार आहे. ज्या पात्र लाभार्त्यांचा दुसरा डोस घेऊन 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झाले असतील तर त्यांना cowin portel वरून दक्षता मात्रा घेण्याबाबत संदेस प्राप्त होणार आहे.
पात्र लाभार्थ्यांनी नजीकच्या लसीकरण केंद्राच्या ठिकाणी जाऊन लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे. कोविड लसीकरणाची दक्षता मात्रा घेऊन स्वताचे कोविड आजारापासून संरक्षण करून घ्यावे असे आवाहन आरोग्य व बांधकाम सभापती वंदना जाधव व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ योगेश साळे यांनी केले आहे.