विकासदर सुधारणार, महागाई नियंत्रणात राहण्याचे अनुमान
मुंबई / वृत्तसंस्था
रिझर्व्ह बँकेने व्याज दरांमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो रेट चार टक्क्मयांवर कायम ठेवण्यात आला असून रिव्हर्स रेपो दरही 3.35 टक्क्मयांवर स्थिर ठेवण्यात आला आहे. ‘लॉकडाऊन’नंतर आता हळूहळू अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याने महागाई दर पुढील काळात नियंत्रणात येईल अशी शक्मयताही वर्तवण्यात आली. त्याचबरोबर जीडीपी वाढीचा दर पुढील तिमाहीत सकारात्मक राहण्याची शक्मयताही यावेळी वर्तवण्यात आली.
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी निर्णयांची माहिती दिली. रिझर्व्ह बँकेच्या सहा सदस्यीय पतधोरण समितीच्या बैठकीला 2 डिसेंबरपासून सुरूवात झाली होती. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने पुढील काही महिने अत्याधिक महत्त्वाचे असल्याचे दास म्हणाले. नजिकच्या काळात पुरेशी रोख रक्कम अर्थव्यवस्थेत उपलब्ध असेल याची आम्ही खात्री देतो. त्याचबरोबर आवश्यक ती योजनात्मक पावलेही गरज भासल्यास उचलली जातील. पुढील तिमाहीतील जीडीपी वाढीचा अंदाज वाढवून 0.10 टक्के करण्यात आला आहे. तर त्याचवेळी, चौथ्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्च 2021 दरम्यान देशातील जीडीपी वाढ 0.70 टक्के राहील असा अंदाज असल्याचे दास म्हणाले. त्याचबरोबर जीडीपी वाढीचा दर संपूर्ण वर्षासाठी उणे 7.5 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अर्थव्यवस्थेला सरकारकडून देण्यात आलेल्या प्रोत्साहक साहाय्यामुळे उभारी मिळण्यास मदत झाली आहे. तसेच निर्मिती क्षेत्र पुन्हा एकदा भरारी घेण्याच्या पवित्र्यात असून उत्पादन दर सप्टेंबर महिन्यात सकारात्मक झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात पीएमआय विकसित बाजारांच्या तुलनेत पोहोचल्याचेही त्यांनी सांगितले.
बँक व्यवहारांमध्ये सुलभता येणार
आरटीजीएस सेवा पुढील काही दिवसांमध्ये ग्राहकांसाठी 24 तास आठवडय़ाच्या सर्व दिवसांसाठी सुरू राहील. कोणतीही मोठी रक्कम देताना बँक सुरू होण्याची किंवा बँक बंद होण्याची वेळ पाहावी लागणार नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले. तसेच 2019-20 या कालावधीसाठी कमर्शिअल बँक लाभांश देणार नाही. तिसऱया तिमाहीत ग्राहक निर्देशांकावर आधारित महागाई 6.8 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 5.8 टक्के राहण्याची अपेक्षा रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली.









