नागरगाळी, कणकुंबी, गोल्याळी, जांबोटी जंगल भागात मोहीम

प्रतिनिधी /बेळगाव
वन खाते, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने व्याघ्र गणनेला शनिवारपासून प्रारंभ झाला. बेळगाव विभागातील नागरगाळी, लोंढा, कणकुंबी, गोल्याळी, जांबोटी आदी जंगल भागात व्याघ्र गणनेची मोहीम राबविली जात आहे. याकरिता विशेषतः लाईन ट्रन्झेक्ट मेथड, कॅमेरा ट्रप मेथड, वाटर होल काऊंटिंग मेथड आदी पद्धतीद्वारे ही गणना होणार आहे.
देशात 2006 पासून दर चार वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते. कोरोनामुळे दोन वर्षे लांबणीवर पडलेल्या व्याघ्र गणनेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरच बेळगाव विभागातील वाघांची संख्या समोर येणार आहे. वाघांच्या संख्येसोबत वनांची स्थिती, वनस्पती, वृक्ष, जलचर, उभयचर पक्षी, प्राणी, मानवी हस्तक्षेप आदींची माहितीही उपलब्ध होणार आहे. वाघांच्या गणतीसाठी जंगलात सेन्सर ट्रक कॅमेरे यासह पावलांचे ठसे आणि वि÷sवरून संख्या निश्चित होणार आहे.
अलिकडे खानापूर तालुक्मयातील वन्य क्षेत्रात वाढ झाली आहे. याबरोबरच घनदाट वनराई, बांबूंचे अच्छादन, हिरवेगार गवत, मुबलक पाणी यामुळे चितळ, सांबर, हरिण, काळवीट या प्राण्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे साहजीकच यांच्यावर उपजीविका करणाऱया वाघांची संख्या वाढली आहे. वाघांच्या गणतीसाठी वन खात्याने विविध सुविधा जंगलात पुरविल्या आहेत. त्यामुळे देशाचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघांची बेळगाव विभागातील संख्या समोर येणार आहे.
वाघांची निर्धिष्ट संख्या समजणार
नागरगाळी जंगल परिसरात वाघांच्या गणतीला प्रारंभ केला आहे. वन्य प्रदेशात टॅप कॅमेरे, सेन्सर बसविण्यात आले आहेत. पायांचे ठसे, विष्ठाची पाहणी केली जात आहे. त्यामुळे वाघांची निर्धिष्ट संख्या समजणार आहे.
– जी. पी. हर्षाबानू (उपवनसंरक्षणाधिकारी, बेळगाव)









