क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
सौंदत्ती येथे झालेल्या जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत येथील ज्योती महाविद्यालयाने विजेतेपद पटकाविले. याच महाविद्यालयाची विद्यार्थिनी वैष्णवी कुंभारची बेंगळूर येथे होणाऱया राज्यस्तरीय स्पर्धेसाठी बेळगाव जिल्हा संघात निवड झाली आहे. तिला क्रीडा प्राध्यापक आर. डी. हदगल यांचे मार्गदर्शन लाभत आहे. खानापूर तालुक्मयातून व कुंभार समाजातून तिच्या या निवडीबद्दल अभिनंदन होत आहे.









