प्रतिनिधी /बेळगाव
वैश्यवाणी समाज महिला मंडळातर्फे महिला दिनानिमित्त समादेवी मंदिर येथे वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 50 वर्षांवरील गटात कांचन मलुष्टे, मृणाल हणमशेट व हिरा मुरकुंबी यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे. उत्तेजनार्थ बक्षीस रजनी मुरकुंबी व गायत्री तुडवेकर यांनी मिळविले. पन्नास वर्षांखालील गटात दिव्या गावडे, कीर्ती पठाणे व श्वेता सटवाणी यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. पूजा मालशेट व अक्षता कलघटगी यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. या स्पर्धेसाठी दीपा देशपांडे व प्रियांका केळकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. निर्मला कणबर्गी यांनी परीक्षकांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमात 20 ज्येष्ट महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षा उज्ज्वला बैलूर, सचिव लक्ष्मी बिडीकर यांसह समाजातील अनेक महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन सुनीता हणमशेट यांनी केले.









