प्रतिनिधी / वैराग
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर शनिवारी दुपारी चारच्या दरम्यान ढगांच्या गडगडाटासह पावसाने वैराग व परिसरात जोरदार हजेरी लावली. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटात तासभर पडलेल्या पावसाने शहराला झोडपले. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला तर काही भागांत झाडांच्या फांद्या कोसळल्या. यात मात्र सोयबीन पिकाच मोठ नुकसान झालं आहे . शेतकरी मोठया संकटात सापडला आहे, या दोन दिवसापासून सतत सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याचे आलेले पीक गेले, त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. वैराग भागातील उपळे, झाडी, बोरगाव, जामगाव, गैाडगाव , रूई, मालेगाव, घाणेगाव, रातजन लगतच्या गावांमध्ये जोरदार पाऊस झाला.
वैरागमध्ये अनेक रस्ते जलमय
दुपारपर्यंत ऊन आणि तीनच्या दरम्यान अचानक सुरु झालेल्या पावसामुळे कामासाठी बाहेर पडलेल्या लोकांची धापवळ झाली. आठवडाभर शहरातील तापमान वाढले असून दिवसरात्र उकाड्याने हैराण झालेल्या वैरागकंरानी काही वेळासाठी तरी दिलासा मिळाला.
देशातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू असल्याने आता पावसाळा संपला असाच नागरिकांचा समज झाला आहे. गेल्या आठवडाभर शहरात पाऊस पडला नाही. तापमान वाढल्यामुळे दिवसभर उकाडा आणि उन्हाचे चटकेही बसत आहेत. शनिवारी सकाळी देखील ऊन होते, उकाडा वाढला होता. ऊन्हाची तीव्रताही जास्त होती. पण तीनच्या दरम्यान ढग दाटून आले आणि वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काळोख पसरला आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडला. विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसाने अनेकांना धडकी भरवली.
Previous Articleचिपळुणातील सर्प, विंचूदंशाच्या रुग्णांनी उपचारासाठी जायचं कुठं ?
Next Article हिरोळी येथील खून प्रकरणातील ४ आरोपी २४ तासात अटक









