प्रतिनिधी / वैराग
येथे कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भेट देऊन सद्य स्थितीचा आढावा घेतला. व तातडीने ठोस उपाययोजना राबवण्याच्या सुचना केल्या.
वैराग शहर व वैराग भागात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. बार्शी तालुक्यात सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या वैराग गावांनमध्ये तात्काळ फवारणी करावी. कोरोनाची वाढती संख्या पाहता प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी यांनी स्वत : काळजी घेऊन काम करत आहे. नागरिकांनी प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. याबाबत उपाययोजना करण्याच्या सुचना खासदारांनी दिल्या.
यावेळी नायब तहसीलदार संजीवन मुंडे, पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, वैराग केंद्राचे डॉ. जयवंत गुंड, ग्रामविकास अधिकारी मुकुंद जगदाळे, तलाठी सतीश पाटील, वैराग मंडळाधिकारी तांबोळी, माजी पंचायत समिती सदस्य निरंजन भूमकर, आरोग्य सेवक, आशा कर्मचारी, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








