वैराग येथील सार्वजनिक नवरात्र महोत्सवातील देवीची दानपेटी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / वैराग
वैराग व परिसरात नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मूळ ठाणे वैराग मधील तुळजाभवानी व देवताळा देवी या मंदिरा बरोबरच वैराग शहरात व परिसरातील गावांमध्ये सार्वजनिक स्वरूपात देवीची प्रतिष्ठापना केली जाते. घटस्थापनेपासून पौर्णिमेपर्यंत हा महोत्सव मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा केला जातो. परंतु यावर्षी असणाऱ्या कोरोना महामारी मुळे नवरात्र महोत्सवावर मर्यादा आलेल्या असल्याने, सर्वजनिक देवीची प्रतिष्ठापना सामान्य पद्धतीने केली आहे. असे जरी असले तरी भाविकांची भक्ती मात्र काही केल्या कमी दिसत नाही. याचा फायदा घेत वैराग मधील एका सार्वजनिक नवरात्र महोत्सवासाठी प्रतिष्ठापना केलेल्या देवीच्या मंडपातील ठेवलेली दक्षिणा पेटीवर मात्र चोरट्यांनी डल्ला मारला. त्यामुळे भाविकात तीव्र संताप व्यक्त होत आहे. वैराग व परिसरात दुकान फोडी नंतर मंदिरांच्या दानपेट्या वर सुद्धा आता चोरटे डल्ला मारून लागल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये भितीचे वातावरण पसरलेले दिसून येते आहे.









