तरुण भारत संवाद प्रतिनिधी / वैराग
कोरोना रुग्णांचा वाढता संसर्ग पाहता वैराग शहरात आणखी सलग गुरुवारपर्यंत चार दिवसाचा जनता कर्फ्युचे आवाहन वैरागकर जनता व व्यापारांनी यांनी केले आहे. वैराग शहरांमध्ये सोमवार दि. ६ ते गुरुवार ९ पर्यंत चार दिवस, वैद्यकीय सेवा शेतीविषयक आवश्यक लागणारे कृषी दुकाने सोडून इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.
या कालावधीत इतर सर्व दुकाने बंद राहणार असून शहराला जोडणारे सर्व उपरस्ते बंद करण्यात येणार आहेत. या कालावधीत शहरातील व बाहेरील नागरिकांनी दवाखाने व मेडीकल सोडून इतर कारणासाठी बाहेर पडल्यास कारवाई केली जाणार आहे. शहरातील व्यापारी खरेदीसाठी सोलापुर, पुणे, मुंबई अशा ठिकाणी गेल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई केली जाणार आहे. तरी जनता कर्फ्यूच्या कालावधीत कोणत्याही नागरिकांनी घराबाहेर पडू नये. असे आवाहन वैराग व्यापारी असोसिएशन व ग्रामस्थ यांनी केले आहे.
या कालावधीतच बाहेरच्या नागरिकांना शहरात प्रवेश दिला जाणार नाही. परंतू आवश्यक असेल तरच वैरागला यावे. अन्यथा येऊ नये. यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनीही सहकार्य करून, ठरवून दिलेल्या वेळेतच शहरात यावे .तसेच चार दिवसाच्या जनता कर्फ्यू नंतर दुकाने उघडल्यानंतर व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे . फिजिकल डिस्टन्स त्याचबरोबर साॅनिटायझर चा वापर करावा. असे आवाहन वैराग व्यापारी असोसिएशन व ग्रामस्थ यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








