प्रतिनिधी / सोलापूर
वैरागमध्ये प्रशासनाच्या समन्वया अभावी कोरोनाचा विळखा वाढत असून वाढता कहर रोखण्यासाठी गावात दहा बाधित क्षेत्र सिल करण्याचा सिलसीला सुरु आहे. कोरोना संसर्गामुळे बाधित रुग्ण वैराग व परिसरात मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र असून प्रशासनात मात्र सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. वैरागमध्ये आजपर्यंत संतनाथ गल्ली, परीट गल्ली, तेले गल्ली, चाटे गल्ली, गवंडी गल्ली, शारदादेवी नगर, निंबाळकर गल्ली, गांधी चौक, रिकाम डेकडी गल्ली आणि विस्तारित भागातील शारदादेवी नगर, शिवाजीनगर, गणेशनगर हे भाग प्रतिबंधात्मक करण्यात आले आहेत. या भागासह अनेक क्षेत्रात रोज त्यात भर पडत आहे. १३ जुलै सोमवारच्या आरोग्य खात्याच्या सायंकाळच्या रिपोर्ट नुसार एकूण पॉझिटिव्ह ५३ असून त्यापैकी ११ जन बरे झाले आहेत तर सात मयत आहेत.
तसेच २६ जनावर बार्शी येथे, ७ जनावर सोलापूर येथे व २ जनावर पुणे येथे उपचार चालू आहेत . वैराग येथील बाधीत विभागातील प्रतिबंध ( शिल ) हा नावालाच आहे. या बाधीत क्षेत्रातून नागरीकांची सतत वाहतुक चालूच आहे. या ठीकाणी बंदोबस्त किंवा रस्त्यावर अडथळे उभा केलेले नाहीत. वास्तवीक पाहता कोरोनाचा फैलाव रोखण्याची प्रत्येकांची जबाबदारी असतानाही प्रत्येकजन ती झटकून डोळेझाक करीत असल्याचे चित्र दिसत आहे. ग्रामपंचायत , शासन,प्रशासन व आरोग्य खाते यांच्यामध्येच समन्वय दिसून येत नसल्याचे चित्र आहे. मागील आठवडयात आठ दिवसाचा जनता कर्फ्यु व्यापाऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने पुकारला व पाळला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी २२ लोक पॉझिटिव्ह निघाले. त्यामुळे नागरीकात घबराट पसरली. त्यानंतर बीडीओ, आरोग्य खाते, पोलीस व ग्रामसेवक यांची बैठक झाली. परंतु ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे नागरिक , व्यापारी संभ्रमात असतानाच परत १४ जुलै मंगळवारपासून लॉकडाऊनचा मेसेज मोबाईलवर फिरत आहे.
परंतु मेसेज संदर्भात महसुल , पोलीस व आरोग्य खात्याने हात झटकले आहेत. तर ग्रामपंचायत मुग गिळून गप्प आहे. तर प्रांत आधिकाऱ्यांनी बार्शी येथे झालेल्या सोमवारच्या बैठकीत १६ ते ३० जुलै पर्यंतची लॉक डाऊनची तारीख सांगितली असली तरीही अधिकृत तारीख ते मंगळवारी जाहीर करणार असल्याचे प्रांत अधिकाऱ्यानी सांगितले आहे. सध्या रूग्णांवर बार्शी, पुणे, सोलापूर, वैराग आदी ठिकाणी उपचार सुरू असून होम कोरोन्टाईम व संस्था विलगीकरण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
कोरोनाचा होणारा फैलाव थांबलेला दिसत नाही. प्रशासनाकडून नागरिकांना वेळोवेळी सुचना व मार्गदर्शन मिळत आहे.परंतू जनता व प्रशासनाकडून प्रभावी अमंलबजावणी झालेली नाही . त्यामुळे एक पासून सुरू झालेली कोरोना बाधितांची संख्या दोन महिन्यात ८२ वर पोहोचली आहे.ही बाब निश्चितच काळजी वाढवणारी असून कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे अवाहन प्रशासन, आरोग्य, व पोलीस यांचे बरोबर ते जनतेचेही कर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. वैराग शहरातील कोरोना पॉझीटीव्ह संखेत वाढ चालूच असल्याने नाकरीकामध्ये घबराट पसरली आहे.