प्रतिनिधी / वैराग
वैरागमध्ये कोरोनाचा वाढता कहर रोखण्यासाठी गावात दहा बाधित क्षेत्र सिल करण्याचा सिलसीला सुरुच आहे. कोरोना संसर्गाचा वाढत आहे. बाधित रुग्ण वैराग व परिसरात मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. वैरागमध्ये आजपर्यंत संतनाथ गल्ली, परीट गल्ली, तेले गल्ली, चाटे गल्ली, गवंडी गल्ली, शारदादेवी नगर, निंबाळकर गल्ली, शिवाजीनगर, गांधी चौक, रिकाम डेकडी गल्ली हे भाग प्रतिबंधात्मक करण्यात आले आहेत. या भागासह अनेक क्षेत्रात रोज त्यात भर पडत आहे.
वास्तवीक पाहता कोरोनाचा फैलाव रोखण्याची प्रत्येकांची जबाबदारी असतानाही प्रत्येकजण ती झटकून डोळेझाक करीत असल्याचे चित्र दिसत आहे. ग्रामपंचायत, शासन, प्रशासन व आरोग्य खाते काम करीत असतानाही आजपर्यंत चार कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. सध्या ३९० रूग्णांवर बार्शी, पुणे, सोलापूर, वैराग आदी ठिकाणी उपचार सुरू असून होम क्वारन्टाईन व संस्था विलगीकरण संख्या ४७२ इतकी असून दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा होणारा फैलाव थांबलेला दिसत नाही.
प्रशासनाकडून नागरिकांना वेळोवेळी सुचना व मार्गदर्शन मिळत आहे.परंतू जनता व प्रशासनाकडून प्रभावी अमंलबजावणी झालेली नाही . त्यामुळे एक पासून सुरू झालेली कोरोना बाधितांची संख्या दोन महिन्यात ८२ वर पोहोचली आहे.ही बाब निश्चितच काळजी वाढवणारी असून कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे अवाहन प्रशासन, आरोग्य, व पोलीस यांचे बरोबर ते जनतेचेही कर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
वैराग शहरातील कोरोना पॉझीटीव्ह संख्या ८२ वर गेली असून ३९० जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या १६ आहे. कोरोनाने मयत झालेली संख्या – चार असून विलगीकरण केलेली संख्या -४७२वर गेली आहे. रोज रुग्णसंख्या वाढत असून रविवारी दोन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे वैरागमधील दहा क्षेत्र प्रतिबंधात्मक जाहीर करून सिल करण्यात आले आहे. अशी माहीती प्रशासनाने दिली.
Previous Articleतळदंगे सरपंच, सरपंच पतीसह कर्मचाऱ्यांवर सशस्त्र हल्ला
Next Article कोल्हापूर जिल्ह्यात सायंकाळ पर्यंत ६६ पॉझिटिव्ह








