मुंबई
वैयक्तिक किंवा पर्सनल लोन घेणे आता सर्वसामान्यांसाठी सोपे नसणार आहे. कोविडच्या प्रादुर्भावानंतर कर्ज घेण्याचे प्रमाण वाढणार असल्याचे संकेत आहेत. हे सर्व पाहता बँकांकडून येणाऱया काळात वैयक्तिक कर्जासाठी कडक नियमावली जारी केली जाणार आहे. सिबीलने यासंबंधीची माहिती नुकतीच दिली आहे. त्यामुळे यापुढे वैयक्तिक कर्जाला मंजुरी सहजासहजी मिळणे कठीण असेल व त्यासाठी अनेक निकषांचा विचार केला जाणार आहे.









