कुडाळवासियांतर्फे हृद्य सत्कार : अनेकांनी व्यक्त केल्या भावना
प्रतिनिधी / कुडाळ:
कुडाळ शहराच्या विकासाला आमदार वैभव नाईक यांनी नेहमीच प्राधान्य देत अनेक विकासकामे मार्गी लावली. शहरासाठी कर्ली नदीवर भंगसाळ पुलाजवळ बंधारा बांधून शहराचा महत्वपूर्ण पाणी प्रश्न मार्गी लावला. मैदान, एस. टी. बसस्थानक, नाटय़गृहासह अनेक विकासकामे मार्गी लावून कुडाळच्या विकासाला खऱया अर्थाने गती दिली. त्यामुळे शहरवासीय त्यांचे ऋण विसरणार नाहीत, अशा शब्दात कुडाळच्या नागरिकांनी शनिवारी येथे आपल्या भावना व्यक्त करीत आमदार वैभव नाईक यांचा सत्कार केला. शहरातील उर्वरित कामेही मार्गी लावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली.
येथील भंगसाळ पुलाजवळ नदीच्या काठावरील महापुरुष गणेश मंदिरानजीक कुडाळमधील नागरिकांच्यावतीने आमदार नाईक यांनी कर्ली नदीवर बंधारा बांधून पाणी प्रश्न सोडविल्याने सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. ऍड. राजीव बिले, संजय पडते, काका कुडाळकर, अरविंद शिरसाट, संजय भोगटे, संदेश पारकर, अमरसेन सावंत व अन्य नागरिक उपस्थित होते.
नदीच्या काठावर पर्यटनदृष्टय़ा उद्यानाची निर्मिती करण्यात येत असून आता जमिनीचा प्रश्न सुटत आला आहे. यासाठी पाच कोटी रु. निधी दिला असून साडेसात कोटी रु. मध्ये चांगले उद्यान उभे राहील, असे नाईक यांनी सांगत यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले. कुडाळ शहर आपल्या दोन्ही निवडणुकांसह अन्यवेळीही पाठिशी राहिले. आपणास भरभरून मतदान केले. त्यामुळे शहराचा विकास करताना आपण नेहमी झुकते माप दिले, असेही ते म्हणाले.
कुडाळ-एमआयडीसीतील बंद उद्योगांच्या जागा ताब्यात घेऊन नवीन सत्तर उद्योग सुरू करण्यात आले. उर्वरित जागाही ताब्यात घेऊन नवीन उद्योगांसाठी देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
ऍड. राजीव बिले यांनी, भंगसाळचे पाणी चिपी विमानतळाला नेऊ नका, अशी विनंती केली. ते सूत्र पकडून नाईक म्हणाले, विमानतळासाठी पाट, परुळे भागात पाण्याचा स्त्राsत शोधण्यात येत आहे. फक्त दोन वर्षे कुडाळमधून पाणी नेण्यात येईल. त्यानंतर पाणी नेण्यात येणार नाही. दोन वर्षे सहकार्य करा. सतीश वर्दम यांनी पाणी सगळय़ांनाच दिले पाहिजे, असे सांगितले.
नाटय़गृहासाठी सहा कोटी रु. प्राप्त झाले असून काम सुरू आहे. एस. टी. बसस्थानकाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत, ते व्यापारी व स्थानिकांना विश्वासात घेऊन प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीने सोडविण्यात येतील, असे नाईक म्हणाले.
महिला व बाल रुग्णालय फेब्रुवारी महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. शहरात मल्टिप्लेक्स थिएटर सुरू करण्याचा विचार असल्याचे ते म्हणाले.
ऍड. राजीव बिले म्हणाले, कुडाळात बंधारा बांधून आमदारांनी चांगले काम केले, म्हणून आपण नागरिक या नात्याने उपस्थित राहिलो. हा नागरिकांच्यावतीने सत्कार आहे. महामार्ग, कचरा प्रश्नी नाईक यांचे आम्हाला सहकार्य लाभले, असेही ते म्हणाले. या बंधाऱयात साचलेले पाणी चिपी विमानतळाला जाता नये. गेले तर वेगळा विचार करावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
नाईक यांनी कुडाळमधील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. बंधाऱयामुळे शहरवासियांना चांगला फायदा होणार असल्याचे काका कुडाळकर यांनी सांगितले.
शहरातील विविध संस्था, जेष्ठ नागरिक, मानकरी यांच्यावतीने नाईक यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अतुल बंगे, स्वागत संतोष शिरसाट, तर आभार राजन नाईक यांनी मानले.









