बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक ठिकाणी सामान्य नागरिकांसह रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक लूट सुरु आहे. वैद्यकीय जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना त्या वाढीव दराने विकल्या जात आहेत. यापार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने नागरिकांची होणारी लूट थांबविण्यासाठी नुकतीच एक घोषणा केली आहे. औषधे, पल्स ऑक्सिमीटर हे इतरांना जास्त दराने विक्री करण्याचा प्रयत्न करणार्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे म्हंटले आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “राज्यात जर अशा घटना आढळून येत असतील आणि वस्तू एमआरपीपेक्षा जास्त रुपयांनी विकल्या गेल्या तर ११२ ला कॉल करून नागरिक आपल्या तक्रार नोंदवू शकतात.” दरम्यान, उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वथ नारायण यांनी दोन लाख पल्स ऑक्सिमीटर खरेदी करण्याबाबतही सरकार विचार करत आहे. “यापैकी २५ हजारची खरेदी पहिल्या टप्प्यात त्वरित केली जाईल,” असे त्यांनी सांगितले.









