बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकातही कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा आणि त्याची किंमत वाढल्याने खासगी रुग्णालयांसाठी एक समस्या बनली आहे
खासगी रुग्णालये आणि नर्सिंग होम असोसिएशनच्या (पीएचएएनए)माहिती नुसार काही कंपन्यांनी ऑक्सिजनच्या किंमतीत अनेक वेळा वाढ केली आहे. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटीने (एनपीपीए) २५ सप्टेंबरला सर्वाधिक दर निश्चित केला आहे. परंतु कंपन्यांना पुढील सहा महिन्यांसाठी राज्य स्तरावर वाहतुकीचा खर्च वाढविण्याची मुभा दिली आहे.
कंपन्यांच्या माहितीनुसार, वाहतुकीच्या खर्चामुळे एनपीपीएने निश्चित केलेल्या दराने ऑक्सिजन तयार करणे आणि पुरवठा करणे शक्य नाही. अशा परिस्थितीत, पीएचएएनएने राज्य औषध नियंत्रक प्राधिकरणाला पत्र लिहून वाढत्या ऑक्सिजनच्या किमतीमध्ये हस्तक्षेपाची विनंती केली आहे.
एका कंपनीचा संदर्भ घेऊन डॉ आर.ए. रवींद्र यांनी कंपनी खासगी रुग्णालयांना वैद्यकीय ऑक्सिजन आणि सिलिंडरची पुरवठा करीत आहे पण जास्त दराने. निश्चित किंमत २३.५२ रुपये प्रति क्यूबिक मीटर आहे. ज्यामध्ये पाच रुपयांची मालवाहतूक आणि १२ टक्के कर समाविष्ट आहे. परंतु आता कंपनी प्रति क्यूबिक मीटर सुमारे ४० रुपये आकारत आहे. नव्या किंमतीवर ऑक्सिजन न घेतल्यास पुरवठा बंद करण्याचा इशारा कंपनीने दिला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांवर आर्थिक बोजा वाढला आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.