वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लीश प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणारे वेस्टहॅम युनायटेड आणि क्रिस्टल पॅलेस फुटबॉल क्लबनी जुलै महिन्यातील आपला ऑस्ट्रेलिया दौरा कोरोना व्हायरस महामारीमुळे बेमुदत लांबणीवर टाकला आहे.
ऑस्ट्रेलियातील क्विन्सलँड येथे होणाऱया पहिल्या क्विन्सलँड चॅम्पियन्स चषक फुटबॉल स्पर्धेत वेस्टहॅम युनायटेड आणि क्रिस्टल पॅलेस हे क्लब सहभागी होणार होते. या दोन्ही फुटबॉल संघांचा सामना ब्रिस्बेन रोअर क्लबबरोबर आयोजित केला होता. क्विन्सलँडमधील ही प्रदर्शनीय फुटबॉल स्पर्धा 11 ते 18 जुलै दरम्यान तीन शहरामध्ये खेळविली जाणार होती. आता कोरोना व्हायरसमुळे वेस्टहॅम आणि क्रिस्टल पॅलेस यांनी आपला ऑस्ट्रेलिया दौरा बेमुदत लांबणीवर टाकला असल्याची घोषणा बुधवारी केली.









