प्रतिनिधी/ मडगाव
श्री महालसा नारायणी देवालय, वरेण्यपुरी (वेर्णा), जुने म्हार्दोळ मंदिराच्या समाजाभिमुख व पर्यावरणाभिमुख कार्य आयामाचा एक भाग म्हणून मंदिराचाच अविभाज्य भाग असलेल्या नुपूर तळीच्या आटत चालेल्या पाण्यावर उतारा म्हणून तिथे योजनाबद्ध जल संधारण करण्यासाठी ‘जल संधारण विकास प्रकल्पा’चा शुभारंभ हल्लीच शेकडो भक्तगणांच्या उपस्थितीत करण्यात आला.
देवालच्या पुनरोद्धार बांधकामाच्या प्रारंभापासून मंदिर हे श्रद्धास्थान व धर्म स्थानाबरोबरच समाजोपयोगी व राष्ट्राभिमुख प्रकल्पाचे केंद्र व प्रेरणास्थान बनावे असा विचार व नियोजन देवस्थान व ट्रस्टीनी केले असून दक्षिण गोव्यातील साळ नदीचे उगमस्थान असलेल्या व श्री महालसा देवीच्या प्रत्यक्ष पदाघाताने निर्माण झाल्याचा पवित्र इतिहास असलेल्या ‘नुपूर तळी’-निर्झराच्या पुष्टीसाठी प्रारंभ होत असलेला नुपूर तळी जलसंधारण प्रकल्प हा त्यातीलच एक प्रकल्प आहे.
मातृभाषेतील पुर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालय शिशुंसाठी नियमित सुवर्णप्रशासन, कला विकासासाठी संस्कार भारती केंद्र असे उपक्रम नियमित स्वरूपात चालू झालेले असून शिशु बालांवर संस्कार करण्यासाठी नियमित संस्कार वर्ग, धार्मिक, सामाजिक व ऐतिहासिक संशोधन केंद्र व त्यासाठी सुसज्ज संदर्भ गंथायल, गोव्याचा इतिहास, विशेषतः पोर्तुगीज पूर्व काळातील ‘सुवर्ण युग निर्माता’, इतिहास, पुण्यभूमी-गोमंतक अशा गौरवशाली इतिहासाचे दर्शन घडविण्यारा दृक श्राव्य यंत्रणा युक्त ‘गोवा दर्शन’ प्रकल्प, मंदिर प्राकारात जल संधारण प्रकल्प, ज्याद्वारे मंदिराच्या पूर्णत्वानंतर नियोजित प्रवेश द्वारासमोर एक समृद्ध तलाव निर्माण होईल. गोशाळा, योगविद्या केंद्र असे अनेक प्रकल्प यथावकाश सुरू करण्याची देवालयाची योजना आहे.
‘जल संधारण विकास प्रकल्पा’च्या शुभारंभी प्रसंगी मडकई-फोंडा येथील शैलेंद पणजीकर यांच्या उपस्थितीत जगदंब ढोल-ताशा पतकासमवेत मिरवणूक नुपूर तीर्थावर आगमन झाले. नंतर या ठिकाणी शास्त्राsक्त पद्धतीने वृक्षारोपण करण्यात आले.









