वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
येथे सुरू असलेल्या कनि÷ांच्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राचा जलतरणपटू वेदान्त माधवनने मुलांच्या गट 1 मध्ये 1500 मीटर फ्रिस्टाईल या क्रीडाप्रकारात नव्या राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकाविले.
वेदान्त हा अभिनेता आर. माधवनचा चिरंजीव आहे. त्याने रविवारी 1500 मी. फ्रिस्टाईल जलतरण प्रकारात 16 मिनिटे 01.73 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक मिळविताना यापूर्वी म्हणजे 2017 साली या स्पर्धेत महाराष्ट्राच्या अद्वैत पागेने नोंदविलेला राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. या क्रीडाप्रकारात कर्नाटकाच्या अमोघ आनंद व्यंकटेशने रौप्यपदक तर बंगालच्या शुभजित गुप्ताने कास्यपदक मिळविले.
या स्पर्धेत मुलींच्या गट 2 मध्ये 400 मी. फ्रिस्टाईल प्रकारात कर्नाटकाची हर्षिका रामचंद्रने 4 मिनिटे 29.25 सेकंदाचा अवधी घेत नव्या स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक पटकाविले. कर्नाटकाच्या एस. रुजुलाने रौप्यपदक मिळविले. हर्षिकाने 200 मी. बटरफ्लायमध्येही आणखी एक नवा स्पर्धाविक्रम करत सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेत दुसऱया दिवसाअखेर कर्नाटकाने पदकतक्त्यात आघाडीचे स्थान मिळविताना एकूण 31 पदकांची कमाई केली असून महाराष्ट्रात 17 पदकांसह दुसऱया तर तेलंगणा 8 पदकांसह तिसऱया स्थानावर आहे.









