प्रतिनिधी/ बेळगाव
येथील वेदांत को-ऑप. सोसायटीच्यावतीने कोरोनाकाळात सेवा बजाविलेल्या कोरोना योद्धे असणाऱया डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. शनिवारी सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. नवजीवन हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सतीश चळीगेर तसेच वडगाव येथील प्रसिद्ध डॉ. सुहास माळी यांनी कोरोनाकाळात केलेल्या उल्लेखनीय रुग्णसेवेबद्दल शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन चेअरमन कृष्णा सायनेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी व्हा. चेअरमन रमाकांत कारेकर, संचालक ज्ञानेश्वर सायनेकर, जयकुमार पाटील, अमर चिल्लाळ उपस्थित होते. प्रारंभी सोसायटीचे दिवंगत संचालक परशराम हलगेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व गणेशपूजन करण्यात आले. वैष्णवी सायनेकर हिने ईशस्तवन सादर केले. सल्लागार जयवंत खन्नुकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन संदीप खन्नुकर यांनी केले. आभार प्रकाश सुळेभावी यांनी मानले.
यावेळी संचालक डॉ. संपत पाटील, बाबासाहेब भेकणे, सोमनाथ धामण्णावर, राहुल अडके, संचालिका सरस्वती होसुरकर, सल्लागार रामकृष्ण बाळकर यांसह सभासद उपस्थित होते.









