चेन्नई :
स्टरलाइट कॉपर प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची अनुमती देण्याची मागणी करणारी वेदांता समुहाची याचिका मद्रास उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली आहे. न्यायाधीश टी.एस. शिवगणानम आणि सुब्बारोयान यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे राजकीय पक्षांनी स्वागत केले आहे. प्रकल्पावरील बंदी सुरूच राहणार असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.









