मंत्री उदय सामंत ; छत्रपती शिवरायांनी लढायला अन् नढायला शिकवलं
प्रतिनिधी/ सातारा
राज्यातल्या तऊणांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी शिंदे-फडणवीस सरकारच्या माध्यमातून रोजगार निर्मिती योजना अधिक सक्षमपणे राबवण्यात येत आहे. गेल्या दहा महिन्यात 13 हजार युवकांना उद्योजक बनवले आहे. नवउद्योजकासाठी 550 कोटींचे अनुदान दिले आहे. युवकांनो पुष्पामधला झुकेगा नही या डायलॉगची आपल्याला आता गरज नाही. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी यापूर्वीच 350 वर्षापूर्वीच कोणापुढे झुकायचे नाही हे शिकवले आहे. मोघलांना त्यांनी अद्दल घडवली. छ. शिवरायांनी लढायला आणि नढायला शिकवले, असा तऊणांना सल्ला देत मंत्री उदय सामंत यांनी राज्यातला वेदांता प्रकल्प अगोदरच्या सरकारने घालवला. वेदांतापेक्षा दुप्पट रोजगार निर्मिती या राज्यात हे सरकार करते आहे, असा दावा त्यांनी करत विरोधकांच्यावर निशाणा साधला.
येथील यशोदा पॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महारोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार उदयनराजे, पालकमंत्री शंभूराज देसाई, माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, जिल्हाधिकारी ऊचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, ज्ञानेश्वर खिलारी, दशरथ सगरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले, प्रथमत: मी उदयनराजे यांना धन्यवाद देतो त्यांनी सातारा ा†जह्यातील सर्वसामान्य तऊणांना रोजगार ा†मळावा म्हणून महारोजगार मेळावा आयोजित करण्यासाठी पाठपुरावा केला आणि या मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. तऊणाईच्या हाताला रोजगार देण्याचं काम आमचे आहे. दोन मा†हन्यांपूर्वी उदयनराजे आमच्याकडे आले होते. त्यांनी रोजगार मेळाव्याबाबत सांगितले होते. जिह्यातील तऊणांना जास्तीत जास्त रोजगार ा†मळवून द्यायचा हेच ध्येय होते. पर्याय नसतो म्हणून तऊण नोकरी करतो. तऊणांनी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारा बनले पा†हजे. याकरता मुख्यमंत्री रोजगार ा†नर्मिती योजना सुऊ केली आहे. गावागावात ही योजना पोहचली पा†हजे. मी मंत्री झाल्यानंतर या विभागाचा आढावा घेतला. नव रोजगार ा†नर्मितीत लक्ष घातले. विशेष तरतूद केली. शिंदे फडणवीस सरकारने गेल्या दहा महिन्यात 13 हजार उद्योजक तयार केले, त्यासाठी 550 कोटींचे अनुदान दिले आहे, असे सांगत ते म्हणाले, मी रायगडचा पालकमंत्री असल्याने येताना रायगडाला गेलो होतो. येवू घातलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्याच्या अनुषंगाने तयारी पाहून आलो. हल्लीच्या तऊणांना पुष्पामधला झुकेगा नहीचा डायलॉग पाहून तऊणाईला एकच सांगणं आहे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वीच कोणासमोर झुकणार नाही हे मोघलांनाही दाखवून दिले आहे. लढायला शिकवले आहे, असे सांगत ते म्हणाले.
संजय राऊत यांच्यासह विरोधकांचा समाचार
पुढे सामंत म्हणाले, टा†रझमसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तऊणांच्या हाताला काम देण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न सरकारच्या माध्यमातून सुऊ आहेत. ज्यांना उद्योगच नाहीत अशी मंडळी पत्रकार परिषदा नुसत्या घेत आहेत असा टोला त्यांनी नाव न घेता संजय राऊत यांच्यावर लगावला. वेदांता हा प्रकल्प अगोदरच्या सरकारमुळेच गेला. मात्र, वेदांतापेक्षा दुप्पट रोजगार देण्यासाठी शिंदे- फडणवीस सरकार प्रयत्नशील आहे, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
साताऱ्यात आयटी पार्कसाठी सकारात्मक साताऱ्यात आयटी पार्क व्हावे असे संग्राम बर्गे म्हणाले, मी त्यासाठी सकारात्मक आहे. प्रयत्न करेन अशी ग्वाही देत पुढे उदय सामंत म्हणाले, राजेंची मागणी आहे म्हणल्यावर केलेच पाहिजे. कामगारांसाठी ऊग्णालय करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. महाराष्ट्र औद्योगिक महामंडळात अधिकारी नेमणुकीसाठी पंधरा दिवसात ऑर्डर काढतो. पावसानंतर मला तारीख द्या, स्कील डेव्हलमेंट सेटंरचा नारळ फोडण्यासाठी मी येतो, असा शब्द देत सामंत म्हणाले, आपण राजकारणासाठी राजकारण करत नाही, समाजकारणासाठी राजकारण करतो, असाही त्यांनी विरोधकांना टोला लगावला.








