प्रतिनिधी/ बेळगाव
नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या वेदगणित या विषयावरील आंतरराष्ट्रीय संमेलनात मूळचे बेळगाव आणि सध्या बेंगळूर येथील रहिवासी असणाऱया विश्वनाथ उणकलकर यांनी संशोधनपर प्रात्यक्षिक सादर केले. त्यांच्या या सादरीकरणाला उपस्थितांनी गौरविले.
विश्वनाथ उणकलकर यांनी स्वामी भारती कृष्णतीर्थ महाराजांच्या विभाज्यता पद्धतीवरून प्रत्यक्ष भागाकार न करता भाजक कसा काढावा याच्या सिद्धतेसह प्रात्यक्षिक सादर करून उपयुक्त माहिती दिली.
चौधरी बन्सीलाल विद्यापीठ, भिवानी (हरियाना) आणि शिक्षा संस्कृती उत्थान न्यास (दिल्ली) यांच्या संयुक्त सहकार्याने या आंतरराष्ट्रीय वेदगणित संमेलनाचे आयोजन नुकतेच नवी दिल्ली येथे केले होते. यामध्ये जगभरातील 16 देशांमधील वेदगणित तज्ञांनी भाग घेतला होता. या संमेलनात वेदगणितावर 60 पेक्षा अधिक संशोधनपर प्रबंध सादर करण्यात आले.
विश्वनाथ उणकलकर यांचे वेदगणितावरील पुस्तकांचे लेखन तसेच अभ्यासाच्या डीव्हीडींचे साहित्य प्रकाशित झाले आहे. भारताबरोबरच अमेरिकेतही त्यांनी या विषयावर दोनशेहून अधिक कार्यशाळा घेतल्या आहेत. तसेच आठशेहून अधिक व्याख्याने दिली आहेत.









