प्रतिनिधी / नागठाणे :
कोरोना संसर्ग झाल्याच्या नैराश्यातून सातारा तालुक्यातील वेचले येथील 85 वर्षाच्या वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. बोरगाव पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोरोनाचा संसर्ग झाल्याने अनेकजण वैफल्य व मानसिक तणावाखाली जात आहेत. कोरोना झाला म्हणजे उपचारच नाहीत असा त्यांचा समज होत असून, काही मंडळी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. आशा दोन घटना बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या आहेत. त्यामध्ये अक्षय नंदकुमार कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शंकर धोंडी कुंभार यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे त्यांनी शुक्रवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली. हवालदार देवकर हे तपास करत आहेत.









