वेंगुर्ले राष्ट्रवादी काँगेसची नगरपालिकडे मागणी
वार्ताहर / वेंगुर्ले:
वेंगुर्ले शहरातील गाळाने भरलेली गटारे अद्याप नगरपालिकेने साफ केलेली नाहीत. त्यामुळे पावसाळ्य़ात समस्या उद्भवणार असून पावसाळय़ापूर्वी शहरातील सर्व पावसाळी गटारे साफ करावीत, अशी मागणी वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी-काँग्रेसतर्फे शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर यांनी लेखी निवेदनाद्वारे वेंगुर्ले नगरपालिकडे केली आहे.
मुख्याधिकारी यांचेकडे वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी-काँग्रेसतर्फे सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पावसाळा 7 ते 8 दिवसांवर आलेला असताना नगरपरिषदेने शहरातील सर्रासपणे सर्वच पावसाळी पाणी निचऱयाची गटारे अद्याप मोकळी (साफसफाई) केलेली नाहीत. वेंगुर्ले नगरपरिषदेने गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून भूमिगत विद्युतवहिनी, पाण्याची लाईन तसेच गँसलाईन टाकताना खोदाई केलेल्या भागातील माती गटारात पडून गटारे भरलेली आहेत. अवेळी पडलेल्या पावसाने सर्वच भागातील गटारे गाळाने भरलेली आहेत. मान्सून काही दिवसात येण्याची शक्मयता असल्याने पावसाळी पाणी निचरा होण्यासाठी गटारे साफ असणे गरजेचे आहे.
दरवषी हि गटारे पालिका प्रशासन पावसाळय़ापूर्वी साफसफाई करत होते. पण, यावेळी फार वेळ झालेला आहे. वेळीच गटारांची साफसफाई न झाल्यास पावसाचे पाणी गटारातून रस्त्यावर व रस्त्यावरून घरात जाऊन नुकसान होण्याची तसेच स्वच्छ शहरात अस्वच्छता निर्माण होणार असल्याने तातडीने शहरातील सर्व पावसाळी पाण्याच्या निचऱयासाठी बांधलेल्या गटारांची साफसफाई करावी, अशी मागणी वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँगेसचे जिल्हा सदस्य नितीन कुबल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









