वेंगुर्ले / प्रतिनिधी-
भाजपा वेंगुर्ले च्या वतीने बुधवार १६ जून रोजी येथील ग्रामीण रुग्णालयासमोर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या दुरावस्थेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लक्षवेध आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या तसेच पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्न देसाई, तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर, महिला तालुका अध्यक्ष स्मिता दामले, दादा केळुसकर, बाबली वायंगणकर, साईप्रसाद नाईक, रवींद्र शिरसाट, प्रणव वायंगणकर, सुरु चवहाण, नगरसेविका श्रेया मयेकर, प्रशांत प्रभू, वसंत तांडेल, दीपक नाईक, वुंदा गवंडळकर, वुंदा मोडेँकर, स्मिता कोयंडे, अँड. सुषमा प्रभूखानोलकर शरद मेस्त्री आदी उपस्थित होते.









