वेंगुर्ले / वार्ताहर:
गणेश चतुर्थी सण कालावधीत बाहेर गावांहून येणाऱ्या लोकांकडे कोव्हीड लसीचे दोन डोस घेतले असल्यास त्यांच्या कोव्हीड तपासणीची गरज नाही. पण एक लस डोस किंवा एकही लस डोस न घेतलेला असल्यास त्यांची अँटीजन रॅपीड टेस्ट करावी, याबाबत जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आरोग्य विभागाने उपाय योजना राबवावी. अशा सुचना आरोग्य विभागास देत सण कालाधीत कोठेही गर्दी करू नये तसेच नागरीकांनी नियमीतपाणे मास्कचा वापर करावा. व गणेश चतुर्थी सण उत्साहात साजरा करावा. असे आवाहन वेंगुर्ले तहसिलदार प्रवीण लोकरे यांनी तालुकास्तरीय गणेश चतुर्थी नियोजन बैठकीत केले.
येथील तहसिलदार कार्यालयात तालुकास्तरीय गणेश चतुर्थी नियोजन बैठक तहसिलदार प्रवीण लोकरे यांच्या अध्यक्षतेखली संपन्न झाली. या बैठकीवेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी व सावंतवाडी प्रांताधिकारी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तहसीलदार यांना या कालावधीतील मार्गदर्शक सूचना बाबत मार्गदर्शन केले. त्यानुसार वेंगुर्ले तहसीलदार यांनी तालुक्यातील उपस्थित पदाधिकारी विविध संस्थांचे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी यांना मार्गदर्शन केले.
या बैठकिस उपस्थित मान्यवरांत महसुल नायब तहसिलदार एल. एम. फोवकांडे, पोलीस निरीक्षक तानाजी मोरे, गटविकास अधिकारी उमा पाटील, नगराध्यक्ष दिलीप गिरप, मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, निवती पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. वारंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे एन. आर. कानडे, वेंगुर्ले बी.एस.एन.एल. केंद्राच्या अधिकारी समृध्दी कामत, वेंगुर्ले तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर, शिरोडा व्यापारी संघाचे अध्यक्ष राजन गावडे, सचिव सचिन गावडे, गटविकास अधिकारी यांचे प्रतिनीधी एस. बी. चव्हाण, टी.बी. नवार, नगरसेवक नागेश गावडे, पोलीस कर्मचारी गजेंद्र भिसे, पी.जी.सावंत, ट्रफिक पोलीस मनोज परूळेकर, पंचायत समिती आरोग्य विस्तार अधिकारी सच्चिदानंद परब, नगरपरीषद सहाय्यक कार्यालयीत अधिक्षक वैभव म्हाकवेकर, फळ विक्रेते प्रितम जाधव, दत्तप्रसाद शारबिद्रे, शेखर धावडे, जगन्नाथ खवणेकर यांचा समावेश होता.
या बैठकित तालुक्यातील वहातुक व्यवस्था सुरळीत पार पडावी, कोठेही वाहातुक कोंडी होऊ नये. याचे नियोजन पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्य़मातtन करण्यांत यावे. स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकारी व प्रशासनाने दुकानांचे नियोजन करण्यांत यावे, सण कालावधीत बाहेर गावांहून येणाऱ्या भाविकांची कोव्हीड तपासणी संदर्भात जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सुचनांनुसार आवश्यक ती तपासणी संदर्भातील उपाय योजना तालुका आरोग्य विभागामार्फत करण्यांत यावी, उभादांडा मानसीश्वर येथे विक्री होणाऱ्या मासळीच्या ठिकाणी घाण वास येतो. तेथील दुर्गधी दूर करण्यासाठी उभादांडा ग्रामपंचायतीने त्वरित उपाय योजना राबवावी. वहातुक कोंडी, लाईट व्यवस्था चोख ठेवावी. याबाबत चर्चा होऊन स्थानिक प्रशासनाने उपाय योजना राबवावी. असे तहसिलदार यांनी सुचित केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









