शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळेंचा बी.के.सी. असोसिएशनच्या माध्यमातून पाठपुराव्याला यश
वेंगुर्ले /वार्ताहर-
बी.के.सी असोसिएशन, वेंगुर्ले ग्रुपच्या माध्यमातून वेंगुर्लेचे सुपुत्र असलेले मुंबई येथील विजू गावडे व सुनिल डुबळे राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केलेल्या प्रयत्नातून प्रबोधन गोरेगांवचे कार्याध्यक्ष विजू गावडे यांनी संस्थेचे संस्थापक तथा राज्याचे उद्योग खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ले येथील डेडीकेटेड कोरोना हेल्थ सेंटरला 5 ऑक्सीजन काँन्स्ट्रेटर प्रदान केले. वेंगुर्ले तालुक्यातील कोरोना रुग्णांना त्यामुळे चांगली सेवा देण्यास मिळणार आहे.
आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालय इमारतीमध्ये 20 कॉटचे डेडीकेटेड कोरोना हेल्थ केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये येणाऱ्या रुग्णांना कोणत्याहि स्वरूपात ऑक्सीजनची कमतरता भासू नये. या उद्देशाने बी.के.सी. असोसिएशन ग्रुप वेंगुर्लेचे सुनिल डुबळे यांनी मुंबईतील सदस्य तथा प्रबोधन संस्थेचे कार्याध्यक्ष विजू गावडे यांच्याकडे वेंगुर्लेच्या डेडीकेटेड सेंटर करीता ऑक्सीजन काँन्स्ट्रेटरसाठी पाठ पुरावा केला होता. त्यानुसार प्रबोधन गोरेगांव संस्थेचे संस्थापक तथा राज्याचे उद्योग खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चांगल्या दर्जाचे 5 ऑक्सीजन काँन्स्ट्रेटर मिळवून दिले.
वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाच्या डेडीकेटेड कोरोना हेल्थ केअर सेंटरसाठी 5 ऑक्सीजन काँन्स्ट्रेटर प्रदान प्रसंगी उपस्थित मान्यवरांत शिवसेना तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, उपजिल्हा प्रमुख सुनिल डुबळे, सचिन वालावलकर, सेनेच्या महिला आघाडी प्रमुख सुकन्या नरसुले, शहर प्रमुख अजित राऊळ, शहरसमन्वयक विवेक आरोलकर, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. अतुल मुळे, डॉ. आझाद, डॉ. डवले, मुख्य आरोग्य सेविका श्रीमती मांजरेकर, विनीता तांडेल, युवा सेना तालुका अधिकारी पंकज शिरसाट, डेलीन डिसोजा, अभिनय मांजरेकर, शैलेश परूळेकर, वेदांत पेडणेकर, सुयोग चेंदवणकर, राहुल नरसाळे आदींचा समावेश होता.









