अजूनही मागणी व प्रवाश्यांच्या भारमानानुसार एस. टी. बसेस सुरू होणार
वेंगुर्ले / वार्ताहर:
वेंगुर्ले तालुक्यात मोठया प्रमाणात प्रवाशांचे भारमान असलेल्या आरोंदा किरणपाणी, रेडी, वायंगणी, कालवीबंदर, भोगवे, हरीचरणगिरी, पालबांबरमार्गे सावंतवाडी, बांदा या भागातील एस. टी. बस सोमवार दि. 23 ऑगस्टपासून वेंगुर्ले आगारातर्फे चालू करण्यात आल्या आहेत.
वेंगुर्ले आगारातर्फे सोमवार दि 23 ऑगस्टपासून चालू करण्यात आलेल्या एसटी बस फेऱ्यात वेंगुर्ले-किरणपाणी सकाळी 11.30 तर किरणपाणी-वेंगुर्ले दुपारी 12:45 वाजता, वेंगुर्ले-रेडी दुपारी 2:45 वाजता तर रेडी-वेंगुर्ले दुपारी 4:15 वाजता, वेंगुर्ले-किरणपाणी (वस्ती) सायंकाळी 7 वाजता तर किरणपाणी- वेंगुर्ले सकाळी 7 वाजता, वेंगुर्ले-वायंगणी सकाळी 08:40 वाजता तर वायंगणी- वेंगुर्ले सकाळी 9:10 वाजता, वेंगुर्ले-रेडी सकाळी 9.45 वाजता तर रेडी-वेंगुर्ले सकाळी 11 वाजता, वेंगुर्ले-वायंगणी 12:10, तर वायंगणी-वेंगुर्ले 12:40, वेंगुर्ले पाल-बांबर मार्गे सावंतवाडी सकाळी 10.30 वाजता तर सावंतवाडी पाल-बांबरमार्गे दुपारी 12 वाजता, वेंगुर्ले-कालवीबंदर दुपारी 2 वाजता तर कालवीबंदर-वेंगुर्ले दुपारी 3.10 वाजता, वेंगुर्ले म्हापण-पाट-परूळे मार्गे भोगवे सायंकाळी 7.30 वाजता वस्तीची गाडी तर सकाळी 6.30 वाजता भोगवे परूळे-म्हापणमार्गे वेंगुर्ले, वेंगुर्ले-कालवीबंदर सकाळी 8.30 वाजता तर कालवीबंदर-वेंगुर्ले सकाळी 9.10 वाजता, वेंगुर्ले-हरीचरणगिरी 11.30 वाजता तर हरीचरणगिरी-वेंगुर्ले दुपारी 12.15 वाजता, वेंगुर्ले शिरोडा-गावठणमार्गे बांदा सकाळी 8.30 वाजता तर बांदा-पाडलोसमार्गे वेंगुर्ले 10.10 वाजता, शिरोडा पाडलोस मार्गे बांदा सकाळी 11.30 वाजता तर बांदा गावठणमार्गे वेंगुर्ले दुपारी 1 वाजता अशा नवीन बसचा समावेश आहे.
या मार्गावरील प्रवाशांनी या एस.टी. बसेसचा लाभ घ्यावा. असे आवाहन वेंगुर्ले बस स्थानक प्रमुख निलेश वारंग यांनी केले आहे.









