वेंगुर्ले / वार्ताहर:
वेंगुर्ले तालुका कब्बडी असोसिएशनच्या मान्यतेने वेंगुर्ले नगरपरीषद पुरस्कृत `नगराध्यक्ष चषक 2021 कब्बडी प्रिमीयर लीग’ स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांचे हस्ते येथील बँ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या पटांगणावर झाले. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 7000, द्वितीय 4000, तृतीय 3000 अशी बक्षीसे असुन वैयक्तिकही बक्षीसे असल्याने वेंगुर्ले तालुक्यातील नामवंत संघानी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे .सदर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य विलास देऊलकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, नगरसेवक गटनेते सुहास गवंडळकर, नगरसेवक प्रशांत आपटे, क्रीडा शिक्षक जे.वाय.नाईक, प्रा. आनंद बांदेकर, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, कबड्डी असोसिएशनचे तुषार साळगांवकर व हेमंत गावडे, क्रीडा प्रशिक्षक जया चुडनाईक व जयराम वायंगणकर, तुळस सरपंच शंकर घारे, उपसरपंच जयवंत तुळसकर, किसान मोर्चाचे बाळु प्रभु, मच्छीमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर तसेच संघमालक व क्रीडारसीक उपस्थित होते.









