वेंगुर्ले / वार्ताहर-
वेंगुर्ले- बागायतवाडी येथील मूळ रहिवासी व कुडाळ येथे वास्तव्यास असलेल्या कु आर्या नरेंद्र गवंडे हिने डॉ होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत कोल्हापूर विभागातून रौप्यपदक प्राप्त केले आहे.
आर्या गवंडे ही बॅ. नाथ पै विद्यालय कुडाळ हायस्कूल इयत्ता नववी मध्ये शिकत असून या वयोगटात यश संपादन करणारी ती जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थीनी ठरली आहे. या तिच्या यशाबद्दल संस्थाचालक, शालेय समिती, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व पालक यांनी तिचे अभिनंदन केले आहे.









