प्रतिनिधी / सोलापूर
साकत ता. बार्शी येथे सेवानिवृत्त वयोवृद्ध आरोग्य कर्मचाऱ्यास अज्ञात चोरट्यांनी मारहाण केली. तीन चोरट्यांनी घराच्या गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच सोने व रोख रक्कम मिळून सुमारे ९३ हजाराचा मुद्देमाल लंपास केला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, एकनाथ दशरथ खटाळ ( वय ७१ ) हे पत्नी कौशल्या एकनाथ खटाळ (वय 65) हे दोघे साकत ता .बार्शी येथे राहतात. त्यांना तीन मुले असून तिन्ही मुले नोकरी निमित्त बाहेरगावी राहण्यास आहेत. २७ जानेवारीला रात्री १० वा. पती-पत्नी जेवण करून घराचे सर्व दरवाजे बंद करून झोपले होते. रात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात तीन चोरट्यांनी घराच्या गेटचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. त्यांनी डोक्यास टोपी , काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातलेली होती. एकाने हातातील लोखंडी गजाने एकनाथ खटाळ यांना मारहाण केली असता त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने पत्नी जागी झाली. चोरटे पतीस मारहण करताना पाहून पत्नीने, माझ्या पतीस मारू नका तुम्हाला हवं ते घेऊन जा अशी विनंती चोरट्यांना केली.
त्यानंतर तिघांपैकी एकाने त्यांच्या हातातील कात्रीने पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे ( १ तोळे ५ ग्रॅ. ) मिनी गंठण , अर्धा तोळ्याचे सोन्याचे डोरले कापून घेतले. तसेच कपाटातील १२ हजार रोख रक्कम व मोबाईल असा एकूण ९३ हजाराचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले.
याबाबत एकनाथ खटाळ यांनी वैराग पोलिसात फिर्याद दिली असून सदर घटनेचा अधिक तपास सपोनि – परजने करीत आहेत.
तिन्ही मुले नोकरी निमित्त बाहेरगावी
दोन मुले कोकणात शिक्षक म्हणून तर धाकटा मुलगा सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर दिघी पोलीस ठाणे, पुणे येथे कार्यरत आहे .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









