प्रतिनिधी / बेळगाव
महिला दिनाचे औचित्य साधून वृत्तपत्र विक्रेत्या संध्या टिंबरे यांचा तरुण भारत वितरण विभागाच्यावतीने सत्कार करण्यात आला. संध्या टिंबरे या बेळगाव शहरात वृत्तपत्र विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. त्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
तरुण भारत वितरण व्यवस्थापक अभिजित ब्रह्मदंडे, कुमार पत्की, भावेश गोजगेकर, गजानन मोतेकर, सुधीर घोडके, संदीप सबनीस यांच्या उपस्थितीत हा सत्कार पार पडला.









