लॉकडाऊनमध्ये वृत्तपत्र वाचनालाच प्रथम प्राधान्य : एका सर्वेक्षणातून झाले उघड
प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनच्या काळात नागरिक मोठय़ा प्रमाणात कोणत्या गोष्टीचा वापर करताहेत? हा तसा संशोधनाचाच विषय. मात्र या संशोधनावर एक उत्तर मिळाले आहे, ते म्हणजे वर्तमानपत्र. सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत विश्वासार्ह, खऱया आणि पडताळणी करून दिल्या जाणाऱया माहितीसाठी नागरिक मोठय़ा प्रमाणात वर्तमानपत्रांचा वापर करत आहेत. फक्त वर्तमानपत्राचा बातम्यांसाठीच वापर करत नाहीत तर आपला दिवसातील किमान एक तास ते वर्तमानपत्रे वाचण्यासाठी घालवितात, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. जास्तीतजास्त नागरिक किमान एक तास वर्तमानपत्र वाचत असल्याचे एका सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे.
किमान एक व्यक्ती दररोज वर्तमानपत्र वाचण्यासाठी सध्या सरासरी कमीतकमी 22 मिनिटे आणि जास्तीतजास्त 1 तास वेळ खर्च करीत आहे. मार्केट रिसर्च क्षेत्रातील फर्म ऍव्हान्स फील्ड ऍण्ड ब्रँड सोल्युशन्सने केलेल्या एका सर्वेक्षणात हे सिद्ध झाले आहे. या फर्मने वृत्तपत्र वाचनासाठी दिला जाणारा वेळ या विषयावर लॉकडाऊनपूर्वीही एक सर्वेक्षण केले होते. लॉकडाऊनपूर्वी एक वृत्तपत्र वाचण्यासाठी सरासरी जास्तीतजास्त 38 मिनिटे वेळ दिला जात होता, असे निदर्शनास आले होते.
सध्या एकूण वाचकांपैकी 40 टक्के वाचक वृत्तपत्र वाचनासाठी 1 तासाचा कालावधी घेत असल्याचे हे सर्वेक्षण सांगते. पूर्वी फक्त 16 टक्के वाचक या प्रकारात मोडत होते. पूर्वी अर्धा तास वृत्तपत्र वाचणाऱयांची संख्या 42 टक्के होती. ती आता थेट 72 टक्क्मयांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. पूर्वी कमीतकमी 15 मिनिटांमध्ये वर्तमानपत्र वाचून संपविणाऱयांची संख्या 14 टक्के होती. आता ती संख्या घटली असून एकूण वाचकांपैकी फक्त 3 टक्के वाचक आता किमान 15 मिनिटे वर्तमानपत्र वाचत आहेत. इतर वाचकांच्या वाचन प्रमाणात वाढ होत असल्याची माहिती मिळत आहे.
नाते अधिक दृढ
या आव्हानात्मक परिस्थितीत
वर्तमानपत्रे व वाचक यांच्यातील नाते अधिक दृढ झाल्याचे हे सर्वेक्षण सांगते. वर्तमानपत्रे
ही आज नागरिकांच्यादृष्टीने अत्यावश्यक गोष्ट ठरली असून माहितीचा सर्वाधिक विश्वासार्ह
स्रोत ही त्याची ओळख बनल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.









